breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 7 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी

तामिळनाडू: तामिळनाडू मधील कुडालोर जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये अचानक स्फोट झाला आहे. या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. अशी माहिती कुडलोरचे पोलिस अधीक्षकांनी दिलेली आहे. हा फटाक्यांचा कारखाना कट्टुमन्नारकोइल येथे आहे. राजधानी चेन्नईपासून हा कारखाना तब्बल 190 किलोमीटर अंतरावर आहे, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत.

हा स्फोट इतका मोठा होता की कारखान्याचा वरील भागही कोसळला आहे. यात कारखान्याच्या मालकाचाही मृत्यू झालेला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. दरम्यान या घटनेच्या अधिक तपशीलाची प्रतिक्षा आहे. गेल्या वर्षी पंजाब मधील बाटला येथील फटाक्यांच्या फॅक्टरीत झालेल्या स्फोटात तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला होता. तर 16 जण जखमी झाले होते. या भयंकर स्फोटात इमारतीला आग लावून ती कोसळली होती. हा कारखाना नवी दिल्ली पासून सुमारे 460 किमी अंतरावर होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button