breaking-newsताज्या घडामोडी

तस्करीसाठी कुख्यात चिखलीत पुन्हा धाड; अख्या गावाचा आहे सहभाग

किनवट | महाईन्यूज

सागवानासह इतर मौल्यवान लाकडांच्या तस्करीसाठी नांदेड जिल्ह्यात कूप्रसिद्ध असलेल्या चिखली गावात पुन्हा ७ जानेवारीच्या पहाटे वनविभागाच्या पथकाने धाड मारली़ या धाडीत सव्वालाख रुपयांचे सागवान जप्त करण्यात आले आहे़ १९९५ पासून या गावावर वनविभागाच्या वतीने धाडी मारल्या जात असल्या तरी, तेथील सागवानाची तस्करी थांबत नसल्याने चिखली ग्रामस्थांच्या या तस्करी प्रकरणाकडे आता वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज दिसत आहे़.

तालुक्यात लाकूड तस्करीसाठी कूप्रसिद्ध असलेल्या चिखली (बु) येथे वनविभागाने महसूल विभागाच्या उपस्थितीत ७ जानेवारी रोजी भल्या पहाटे धाड टाकली़ यावेळी १ लाख १४ हजार ६२५ रुपये किमतीचे सागवानाचे मौल्यवान कटसाईज व गोल माल १९४ नग जप्त केले़ यापूर्वी ऑपरेशन ब्ल्यू मुन, ऑपरेशन चिखली यासारखी मोहीम राबवून लाखों रुपये किमतीचा माल जप्त केलेला होता. चिखली (बु) गावात अवैध सागवानी लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती़ त्यावरून नांदेडचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, किनवटचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक व्ही़ एऩ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसहा वाजता नायब तहसीलदार सर्वेश मेश्राम व वनक्षेत्रपाल के़ एऩ खंदारे, बी़पी़आडे, पीक़े़शिंदे, किनवट फिरत्या पथकाचे योगेश शेरेकार, अविनाश तैनाक, श्रीकांत जाधव, आऱआऱचोबे, वनपाल के़जी़ गायकवाड, एस़ एऩ सांगळे, आऱ एऩ सोनकांबळे, मोकले व महिला कर्मचाऱ्यांनी चिखली (बु) येथे धाड टाकली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button