breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

टिक-टॉकवर व्हिडिओ करताना जीव गमावला, पहा व्हिडिओ

सोशल नेटवर्किंग साइट टिक-टॉकवर व्हिडिओ करताना अनेकवेळा अपघात झालेत. अनेकवेळा असे व्हिडिओ तयार करताना युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नुकताच उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे अशीच एक घटना घडली आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

ही घटना दोन ते तीन दिवसांपूर्वीची आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील मीरापूर येथील एका गल्लीत राहणारा युवक आपल्या मित्रांबरोबर नदीवर गेला होता. व्हिडिओत त्या युवकाचा मित्र टिक-टॉक व्हिडिओ करण्याबाबत बोलत आहे. तर दुसरा मित्र त्याला परत येण्यास सांगत आहे. त्यानंतर तो युवक काही पाऊल मागे येऊन डोक्यावर पाण्यात उडी मारतो.

पाण्यात उडी मारल्यानंतर युवकाचे डोकं कुठल्यातरी दगडाला धडकले. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचा मृत्यू उपस्थितांच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. मृत युवकाच्या कुटुंबीयांनी यासाठी त्याचा मित्रावर हत्येचा आरोप केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button