Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
टाळेबंदीत काळा बाजार करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा – केंद्राच्या राज्यांना सूचना
![District wise Independent Transport Contract Tender Process for Efficient Transportation of Ration Transport - Food and Civil Supplies Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/ration-shop_20171017808.jpg)
जीवनावश्यक वस्तुंचा अनेकजण साठा करत असल्याचे तसेच त्या काळ्या बाजारात भरमसाठ दरानं विकत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी गुन्हे दाखल करावेत व कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना केली आहे. करोना व्हायरसमुळे असलेल्या बंदचा गैरफायदा समाजकंटक घेत असल्यामुळे ही उपाययोजना करण्यात येत आहे. Essential Commodities Act, 1955 अंतर्गत अशी कारवाई करण्यात येते.