breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘जेट एअरवेज’ संकटात; विजय मल्ल्या म्हणतो, ‘पैसे घ्या पण कंपनीला वाचवा’

मुंबई – जेट एअरवेजवर आर्थिक संकट कोसळलं आहे. त्यांना आधार देण्यासाठी सरकारने सर्व बँकांना हाक दिली आहे. कर्ज देणाऱ्या 26 बँकांपैकी 2 बँका जेटच्या मदतीसाठी धावल्या आहेत. जेटच्या रुपाने किंगफिशरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, अशी हाकच सरकारकडून देण्यात आली होती. दरम्यान बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून पसार झालेल्या विजय मल्ल्याने आपल्याला मदत करण्यासाठी सरकारने काहीही प्रयत्न न केल्याने त्याने मोदी सरकारवर टीका केली आहे.

आपण किंगफिशरला वाचवण्यासाठी केलेली गुंतवणूक आणि प्रयत्न याकडे दुर्लक्ष करत विनाकारण टीका करण्यात आली असं विजय मल्ल्याने म्हटलं आहे. तसंच विजय मल्ल्याने एनडीए सरकार दुटप्पी वागत असल्याचीही टीका केली आहे. यासंदर्भात मल्ल्याने ट्विट केले आहे.

‘कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी मी किंगफिशर एअरलाइन्समध्ये 4000 कोटींची गुंतवणूक केली. पण त्याची अजिबात दखल न घेतला शक्य तितकी टीका माझ्यावर करण्यात आली. याच सरकारी बँकांनी भारतातील सर्वोत्कृष्ट असलेल्यांपैकी एका कंपनीला बुडू दिलं. एनडीए सरकारची दुटप्पी भूमिका’, असं विजय मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भाजपा सरकारने किंगफिशरला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल वारंवार मनमोहन सिंग यांच्या सरकारवर टीका केली. पण आता त्यांनीही नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजसाठी तेच केलं आहे. विजय मल्ल्याने सरकारी बँकांना आपली ऑफर मान्य करत जेट एअरवेजला वाचवा असं सांगितलं आहे, असंही त्याने म्हटलं आहे.

किंगफिशर एअरलाइन्स 2012 मध्ये बंद पडली. दिवाळखोरीमुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या होत्या, तर करोडोंचं नुकसान झालं होतं. मल्ल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, कर्ज फेडण्यासाठी माझ्या संपत्तीची माहिती मी कर्नाटक उच्च न्यायालयात दिली आहे. मग बँका माझे पैसे घेत का नाहीत. हेच पैसे वापरुन ते जेट एअरवेजला वाचवू शकतात’.

आठ हजार कोटींचे कर्ज थकलेल्या आणि प्रचंड तोट्यात असलेल्या जेट एअरवेजचा व्यापार बुडू नये म्हणून आपत्कालीन कर्ज देण्यास स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकने तयारी दर्शवली आहे. समभाग खरेदीच्या रूपातील जेट एअरवेजवरील स्टेट बँकेचे वर्चस्व तात्पुरते राहणार आहे. 1500 कोटी रुपयांच्या अर्थसहाय्यासह सर्वात मोठय़ा सरकारी स्टेट बँकेने कंपनीवर 51 टक्के मालकी मिळविली असली तरी नव्या भागीदाराकरिता प्रक्रिया करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button