breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जिओचा ३९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 75GB डेटासोबत अनेक सुविधा

नवी दिल्ली – रिलायन्स जिओ नुकतीच नवीन पोस्टपेड धन धना धन प्लान घेवून आले आहे. या अंतर्गत कंपनीने ५ नवीन पोस्टपेड प्लान आणले आहेत. याची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होते. कंपनीने याला नाव दिले आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात इंटरनेट डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबत ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी स्वस्त प्लानची माहिती देत आहोत. ज्याची किंमत ३९९ रुपये आहे.

३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लस प्लान
जिओच्या या पोस्टपेड प्लानमध्ये ७५ जीबी हाय स्पीड डेटा मिळतो. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली जाते. इंटरटेनमेंटसाठी प्लानमध्ये जिओ अॅप्स सोबत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

तसेच या प्लानध्ये अनेक सुविधा दिल्या जातात. यात फीचर्स म्हणून २०० जीबी पर्यंत डेटा रोलओवर आणि वाय फाय कॉलिंग मिळते. तर जबरदस्त एक्सपिरियन्ससाठी यात फ्री इंटरनॅशनल रोमिंग, आयएसडी, सिम होम डिलिवरी, आणि सध्याच्या जिओ नंबरला पोस्टपेड बदलण्याची सुविधा आणि प्रीमियम कॉल सेंटर सारखी सुविधा मिळते.

३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान
रिलायन्स जिओ याच किंमतीत प्रीपेड प्लान ऑफर करीत आहे. ३९९ रुपयांच्या रिचार्जमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. रोज १.५ जीबी डेटा मिळतो. या प्रमाणे एकूण ८४ जीबी डेटाचा वापर करू शकता. यात जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कसाठी २ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन आणि रोज १०० एसएमएसची सुविधा मिळते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button