breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

जाणता राजा ही ‘शिवछत्रपतीं’ची उपाधी नव्हेच – शरद पवार

सातारा|महाईन्यूज|

जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणलेला आहे. जे लोक सांगतात रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते ते खोटे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंत:करणांत छत्रपतीच राहतील. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार यांनी येथील माजी आमदार (कै) भाऊसाहेब गुदगे यांच्या स्मारकाला भेट दिली. त्यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे उपस्थित होते. पवार यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा नामोल्लेख टाळत जाणता राजा बाबत कोणी तरी काही तरी बोलले आहे आणि त्यावर मी बोलावे असे आज (बुधवार) माध्यमांचे प्रतिनिधी माझ्यामागे लागले आहेत.

जाणता राजा स्पष्टीकरण देताना पवार म्हणाले मला कार्यकर्ते जाणता राजा म्हणतात. पण मी कोणालाही जाणता राजा म्हणा असे सांगत नाही आणि कोणाला सांगायलाही गेलेलो नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे अभ्यास करून वाचला, तर छत्रपती यांची उपाधी शिव छत्रपती हीच होती. जाणता राजा ही नव्हती. जाणता राजा हा शब्द रामदासांनी आणलेला आहे. जे लोक सांगतात रामदास शिवाजी महाराजांचे गुरू होते ते योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू राजमाता जिजाऊ या आहेत. शिवरायांचे व्यक्तीमत्व घडले ते मातेमुळेच त्यांच्या संस्कारातूनच. शिवाजीराजेंचा कालखंड अभ्यासला तर त्या कालखंडात रामदास नव्हते. पण त्या काळात काही लोकांच्या हातात लेखणी होती. त्यामुळे या कर्तृत्व संपन्न महामानवाला घडविण्याचे काम कुणीतरी रामदासांनी केले अशी लेखणीची कमाल कुणीतरी केली.

शिवरायांचे कर्तत्व हे स्वकर्तृत्व आणि मार्गदर्शन आणि संस्कार मातेचे संस्कार आहेत. असे हे महाआयामी व्यक्तीमत्व देशात आले. त्यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही. छत्रपती जन्माने कर्तृत्वावाने लोकांच्या अंतकरणात छत्रपतीच राहतील. दुसरे काहीही म्हणायची गरज नाही. याबाबतचा आग्रह आमचा असणार नाही.कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारीमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button