Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-कश्मिर : शोपियानमधील मिनी सचिवालयावर दहशतवादी हल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/army-1.jpg)
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरातील शोपियानमधील मिनी सचिवालयावर आज सकाळी दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी मिनी सचिवालयाच्या मुख्य गेटवर सीआरपीएफच्या जवांनांवर निशाणा साधत फायरिंग केली. त्यावर भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यात आलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी तिथून पळ काढला.
मिनी सचिवालयातून पळ काढल्यानंतर दहशतवाद्यांनी आजूबाजूच्या परिसराचा लपण्यासाठी आसरा घेतला. त्यानंतर जादा फोर्स मागवत त्या संपूर्ण परिसरात सीआरपीएफच्या जवानांनी तपास अभियान सुरु केलं आहे. दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली नाही. तसेच आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचीही माहितीही मिळालेली नाही. गोळीबार झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे.