Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
जम्मू-कश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय जवानांचे ‘ऑपरेशन’ अद्याप सुरूच!

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवर तणाव सुरू असतानाच जम्मू-कश्मिरमध्ये दशहतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत भारतीय जनावांनी तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले.
शोपियांच्या एम्शिपोरा भागात चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ऑपरेशन अद्याप सुरू आहे, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, पुंछ जिल्ह्यातील गुलपूर भागातील करमरहा सेक्टरमध्ये काल झालेल्या युद्धबंदीच्या उल्लंघनात तीन नागरिकांचा बळी गेला आहे.





