जगभरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या पोहोचली ६.६२ कोटींच्या घरात
![# Covid-19: 42,000 new corona patients across the country; 3998 victims](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus.jpg)
मुंबई – कोरोनाबाबतची भिती कमी झालेली असली तरीही जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंताही व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांत २१८ देशांमध्ये ६.६६ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, १२ हजारांहून अधिक रुग्ण मृत झाले आहेत. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६.६२ कोटींच्याही पुढे गेला आहे. तर, गेल्या आठवड्याभरापासून दररोज ११ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढली आहे. अमेरिक सर्वाधिक मृत्यू होत असल्याची नोद आहे.
जगभरात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 कोटी 62 लाख 11 हजार 27 वर पोहोचला आहे. यापैकी 4 कोटी 57 लाख 97 हजार 676 रुग्ण बरे झाले आहेत, तर 15 लाख 23 हजार 556 बाधितांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सध्या 1 कोटी 88 लाख 89 हजार 795 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे.
भारत दुसऱ्या क्रमाकांवर
आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरीकेत 1 कोटी 47 लाख 72 हजार 535 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 86 लाख 58 हजार 882 रुग्ण बरे झाले आहेत, तर 2 लाख 85 हजार 550 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या नंबरवर आहे. भारतात आतापर्यंत 96 लाख 8 हजार 418 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 90 लाख 58 हजार 3 रुग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 39 हजार 736 बाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाबाधितांबाबतची ही आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले टॉप 10 देश
अमेरिका : एकूण कोरोनाबाधित – 14,772,535, मृत्यू – 285,550
भारत : एकूण कोरोनाबाधित – 9,608,418, मृत्यू – 139,736
ब्रझील : एकूण कोरोनाबाधित – 6,534,951, मृत्यू – 175,981
रशिया : एकूण कोरोनाबाधित – 2,402,949, मृत्यू – 42,176
फ्रान्स : एकूण कोरोनाबाधित – 2,268,552, मृत्यू – 54,767
स्पेन : एकूण कोरोनाबाधित – 1,699,145, मृत्यू – 46,252
यूके : एकूण कोरोनाबाधित – 1,690,432, मृत्यू – 60,617
इटली : एकूण कोरोनाबाधित – 1,688,939 , मृत्यू – 58,852
अर्जेंटिना : एकूण कोरोनाबाधित – 1,454,631, मृत्यू – 39,512
कोलंबिया : एकूण कोरोनाबाधित – 1,352,607, मृत्यू – 37,467