Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा BSF वर हल्ला, चकमकीत चार जवान शहीद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/BSF.jpg)
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना नक्षलवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांवर हल्ला केला आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यामधील कांकेर जिल्ह्यात हा हल्ला झाला. नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह तीन कॉन्स्टेबल शहीद झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफ जवान महाला परिसरातील जंगलात गस्तीवर असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली. कांकेरचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक किरण राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चार जवान शहीद झाले असून, दोन जखमी झाले आहेत. शहीद झालेल्यांमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे’. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.