breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनमध्ये एकाच वेळी दिसले ३ सूर्य सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बीजिंग – अनेकदा निसर्ग आपली थक्क करुन टाकणारी रुपे दाखवत असतो. असंच निसर्गाचे दुर्मीळ रुप चीनच्या मोहे शहरात पाहायला मिळालं. या ठिकाणी शनिवारी लोक सकाळी उठले तर त्यांना आकाशात चक्क ३ सूर्य पाहायला मिळाले. हे पाहून तेथील लोक चकित झाले. ही दुर्मीळ घटना जवळपास ३ तास आकाशात पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांनी ही मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल झाले आहेत.
चीनच्या मोहे शहरात एकाच वेळी दिसलेल्या ३ सूर्यांपैकी २ मात्र खरे नव्हते. ‘सन डॉग’ या घटनेमुळे एका सूर्याऐवजी ३ सूर्य पाहायला मिळत होते. हा एक प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजन म्हणजेच दृष्टीभ्रम आहे. जेव्हा आकाशात खूप उंचीवर सूर्य किरणे बर्फामधून जातात तेव्हा एका सूर्याच्या ठिकाणी अधिक सूर्यांचा भास होतो. मूळ सर्याच्या अवतीभवती दिसणाऱ्या या चमकणाऱ्या स्पॉट्सला फँटम सन म्हणतात.
चीनच्या आकाशात हा दुर्मीळ नैसर्गिक योग लोकांनी जवळपास ३ तास पाहिला. सकाळी ६:३० ते ९:३० वाजण्याच्या दरम्यान हे ३ सूर्य पाहता आले. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. अनेक लोकांनी ही दुर्मीळ घटना आपल्या फोनमध्ये कैद करुन इतरांसोबत शेअर केली आहे. मागील काही वर्षांमधील हा सर्वात काळ पाहता आलेला सन डॉग मानला जात आहे. याचे व्हिडीओ आणि फोटो पाहून जगभरातील अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button