breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

चरस आणि एमडी ड्रग्सचा साठा जप्त, औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई

औरंगाबाद| बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अंमलीविरोधी पथकाकडून (NCB) चौकशीचं सत्र सुरूच आहे. या चौकशीमुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची झोप उडाली आहे. त्यात औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील पंचवटी चौकात चरस आणि एमडी (मॅफो ड्रोन) ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एमडी ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी पंचवटी चौकातून जप्त केले आहे. ड्रग्स साठा शहरात विक्रीसाठी आणण्यात आला असावा, असा संशय पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी स्कॉर्पिओ वाहनातून अंमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी पंचवटी चौकात सापळा रचून ती चारचाकी वाहन थांबवलं. त्या गाडीची झडती घेतली असता त्यात एमडी नावाच्या ड्रग्सच्या 13 पुड्या व चरस या अंमली पदार्थाच्या 25 पुड्या आढळून आल्या. ळ्या बाजारात या ड्रग्स किंमत एक कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपी सहित एक वाहन पोलिसांनी जप्त केली आहे. वेदांत नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button