breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गोंदियात एकतर्फी प्रेमातून 20 वर्षीय तरूणीवर अॅसिड हल्ला, दोघांना अटक

गोंदिया / विदर्भातील गोंदियात खळबांधा गावात राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून दोन अज्ञात इसमांनी अॅसिड हल्ला करत पळ काढला होता. या हल्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे. मुख्य आरोपी खामेंद्र जगणीत(24) आणि त्याचा मित्र राहुल न्हनेद (24) हे दोघेही गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते. दरम्यान, पीडित तरुणीही गोंदियात अभियांत्रिकीचे शिक्षणल घेत आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. खळबांधा गावात राहणारी सदर तरुणी ही नागपुरच्या प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनियरींगचे शिक्षण घेत आहे.

महाविद्यालयाला सुट्या लागल्या असल्याने काही दिवसाआधी ती स्वगावी आली होती. पुन्हा कॉलेजसाठी नागपूरला जाण्याकरीता खळबांधा गावातून मुंडीपार बस स्थानकावर आली असताना. यावेळी दोन अज्ञात तरुणांनी एका दुचाकी वाहनावर कापड बांधून येत तरुणीवर अॅसिड टाकत पळ काढला. तिच्या अंगावर अॅसिड टाकल्यानंतर ती मुलगी बस स्थानकावर आरडाओरड करु लागली आणि तडफडू लागली. गावकऱ्यांनी याची सूचना पोलिसांना देत सदर मुलीला गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तिची प्रकृती अधिक बिघडत चालल्याने तिला पुढील उपचाराकरता नागपुरला हलविण्यात आले. अ‍ॅसिड हल्ल्याची गंभीर दखल घेत सरकारने असे कृत्य हे नृशंस गुन्हा म्हणून गणला जाईल, असं सांगितलं होतं. तसेच पीडितांना जलदगतीने न्याय मिळावा यासाठी तपास आणि सुनावणीसाठी कालमर्यादा घालून देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वी घेतला आहे. अ‍ॅसिड हल्ल्याचे कृत्य हा अत्यंत घृणास्पद गुन्हा म्हणून गणला गेल्यास अशा खटल्यांमधील आरोपीला अधिकाधिक शिक्षा म्हणून जन्मठेप किंवा मृत्युदंड देणे शक्य होईल, असे केंद्र सरकारने याआधीच जाहीर केले आहे. मात्र तरीही अ‍ॅसिड हल्ले रोखले जात नाहीयेत. आता गोंदियातल्या या हल्लानंतर ग्रामीण भागापर्यंत अ‍ॅसिड हल्ल्याचे लोण पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींकडे हे अ‍ॅसिड कुठून आले? असा सवाल देखील गावकरी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button