breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

गुगल पे ने सुरू केली टोकन सेवा; व्यवहारासाठी आता डेबिट-क्रेडिट कार्ड स्वाइप कराव लागणार नाही

गुगल पे ने आपल्या युजर्ससाठी टोकनाइजेशन सेवा सुरू केली आहे. याद्वारे युजर्स आपल्या डेबिट-क्रेडिट कार्डचा सुरक्षित वापर करू शकतील. टोकनाइजेशनद्वारे गुगल पे च्या युजर्सला व्यवहारासाठी आपले डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाइप करावे लागणार नाही.तर, कार्डशी कनेक्ट असलेल्या अटॅच्ड सुरक्षित डिजिटल टोकनद्वारे पेमेंट करता येईल. हे फीचर निअरफील्ड कम्युनिकेशन्स इनेबल्ड PoS टर्मिनल्स आणि ऑनलाइन मर्चेंट्सवर ‘टॅप टू पे’ फीचरचा वापर करण्याची सुविधा देते. थोडक्यात म्हणजे या फीचरद्वारे पेमेंट मशीनवर क्यूआर स्कॅन करून पैसे देता येतील.

कंपनीने माहिती दिली की, व्हिजा आणि बँकिंग भागीदारीसह ही सुविधा आता अ‍ॅक्सिस आणि एसबीआय कार्डच्या सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. कोटक व अन्य बँकांच्या युजर्ससाठी देखील लवकरच ही सुविधा उपलब्ध असेल.

स्मार्टफोनवर टॅप अँड पे फीचर सुरू करण्यासाठी युजर्सला आपल्या कार्डची माहिती भरून वन टाइम सेटअप करावे लागेल. युजर्सला कार्ड अ‍ॅड करण्यासाठी बँकेकडून एक ओटीपी येईल. नोंदणीनंतर या फीचरचा वापर एनएफसी इनेबल्ड टर्मिनल्सवर पेमेंट करण्यासाठी करता येईल.

कंपनीनुसार, या सुविधेमुळे 25 लाखांपेक्षा अधिक व्हिसा व्यापारी ठिकाणांवर कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येईल. यासोबतच 15 लाखांपेक्षा अधिक युजर्सला क्यूआर स्कॅन करून पेमेंट करू शकणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button