breaking-newsताज्या घडामोडी

गडचिरोलीत 22 जवानांना कोरोनाची लागण, सुट्टीवरून परतल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह

गडचिरोली | परप्रांतातून गडचिरोली शहरात आलेल्या सीआरपीएफच्या 22 जवानांना कोविड-19 ची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय भंडारा जिह्यातून भामरागड तालुक्यात आलेला एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. गडचिरोली शहरातील 22 रुग्ण हे पेंद्रीय राखीव दलाच्या 192 बटालियनचे जवान आहेत.

काल रात्री आरोग्य विभागाकडून मिळालेल्या अहवालानुसार सर्व 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यात सीआरपीएफचे 22 जवान बाहेर राज्यातील असून, सुट्टीवरून नुकतेच गडचिरोली शहरात दाखल झाले होते. लगेच त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. यापूर्वी अहेरी व देसाईगंज येथील प्रत्येकी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेही बाहेरून आले होते. आतापर्यंत जिह्यात एकूण 73 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, 59 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 13 सक्रिय कोरोनाबाधितांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button