Breaking-newsताज्या घडामोडी
गडचिरोलीत एसआरपीएफच्या 5 जवानांना कोरोनाची लागण
![The state recorded 3,314 new corona patients in the last 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/corona_positive.jpg)
गडचिरोली : काल रात्री गडचिरोली येथील 3, वडसा येथील 2 एसआरपीएफ जवान कोरोनाबाधित आढळून आले. तर गडचिरोली नवेगाव येथील महिला नांदेडवरून परतलेली कोरोनाबाधित आढळून आली. तसेच गुरवाळा येथील जिल्ह्याबाहेरुन आलेला एकजण गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होता त्याला कोरोनाचे संसर्ग झाल्याचे आढळून आले.
तसेच गडचिरोली येथील कोरोना सेंटर येथील 5 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना काल रात्री दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. रात्री नव्याने आढळलेल्या 7 नवीन बाधितांमूळे सक्रिय रूग्णांची संख्या 185 झाली आहे. तर गडचिरोलीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 350 वर गेली आहे. आत्तापर्यंत 164 रूग्ण बरे झाले तर 1 मृत्यू आहे.