Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
गंगापूर तालुक्यात पहिला रुग्ण, 70 वर्षीय वृद्धाला कोरोनाची बाधा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/corona-new-2.jpg)
औरंगाबाद | गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा येथील एका 70 वर्षीय व्यक्ती आज कोरोना पॉझिटिव्ह निघाली. रिपोर्ट निघालेल्या सायंकाळ पासून आधीच कोरोनाची धास्ती धरुन बसलेल्या गंगापूरला हा मोठा धक्का बसला आहे. शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होत असताना आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
या 70 वर्षीय व्यक्तींचा मुलगा ट्रक चालक आहे. मुलगा मुंबईहून येऊन तीन ते चार दिवस झाले आहे. त्यामुळे त्याच्या वडिलांना कोरोना झाल्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त त्याच्या संपर्कात आलेले गंगापूर शहरामध्ये एक खाजगी हॉस्पिटलमध्ये चार डाॅक्टर, त्यांच्या घरातील 14 जणांना व इतर नातेवाईकांना येथील गंगापुर उपजिल्हा रुग्णालयात क्वारामटाईम करण्यात आलेले आहेत.