breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरच्या वादग्रस्त शालिनी सिनेटोनचा प्रश्न महापालिकेच्यासभेत पुन्हा ऐरणीवर

वादग्रस्त शालिनी सिनेटोन येथे झाडे लावण्यास महापालिकेने परवानगी नाकारली आहे. तर ही जागा वारसाहक्क स्थळात (हेरिटेज) समाविष्ट असताना, विकसकाने याठिकाणी सपाटीकरणाचे काम सुरु केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. हे काम तातडीने थांबवावे, अशी मागणी शुक्रवारी स्थायी समिती सभेत करण्यात आली आहे. प्रशासनाने आज या जागेवर काम सुरु नसल्याचा खुलासा केला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर  शुक्रवारची स्थायी समितीची सभा सभापती संदीप कवाळे यांनी छत्रपती ताराराणी सभागृहात घेत समिती सदस्य यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. वादग्रस्त ठरलेल्या शालिनी सिनेटोनचा प्रश्न सभेत पुन्हा ऐरणीवर आला.

माजी उप महापौर भूपाल शेटे यांनी शालिनी सिनेटोन येथे काम सुरु असल्याचा दावा केला. हा कोल्हापूर शहराच्या अस्मीतेचा प्रश्न आहे. ही जागा वारसाहक्क स्थळात असूनही विकसकाने परवाना मंजूर नसताना, सपाटीकरणाचे काम सुरु केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. हे काम तातडीने थांबवावे. झाडे लावणेसाठी उद्यान विभागाने परवानगी दिलेली नाही. सहाय्यक संचालक नगररचना व उपशहर रचनाकार यांनी समक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. उप शहर रचनाकार एन.एस.पाटील यांनी आज जागेवर काम सुरु नाही. तेथे वृक्षारोपण केले जात असल्याचे सांगितले. शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी याठिकाणी झाडे लावण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button