breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात भाजपाचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचा कोरोनाने मृत्यू

कोल्हापूर – महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक संतोष गायकवाड यांचा काल शनिवारी कोरोनाने मृत्यू झाला. संभाजीनगर प्रभागाचे नगरसेवक गायकवाड हे उत्तम फुटबॉलपटू होते. कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आल्यानंतरही त्यांनी उपचारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे काल सायंकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात काल दिवसभरात कोरोनाने ६ जणांचा बळी घेतला आहे.

कोल्हापूर शहर आणि परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. त्यात शहरातील वारे वसाहत परिसरात हॉटस्पॉट बनला आहे. काही दिवसापूर्वी गायकवाड यांच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर नगरसेवक गायकवाड यांनाही कोरोना झाला. पण त्यांनी उपचाराकडे दुर्लक्ष केले. यातूनच काल सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button