breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पहाटे भीषण आग

कोल्हापूर – कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरला आज पहाटे भीषण आग लागली. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे रुग्णालयाच्या वॉर्डमध्ये धूर आणि लोळ पसरले होते. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगितले आहे.

मुंबई-पुण्यानंतर कोल्हापुरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याने नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण असताना आज पहाटेच्या सुमारास ही भीषण आगीची दुर्घटना घडली. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. सीपीआरच्या या विभागात कोरोनाच्या अतिगंभीर १५ रुग्णांवर उपचार सुरू होते. ही आग लागल्याचे लक्षात येताच सुरक्षारक्षक आणि डॉक्टरांनी इथल्या कोरोना रुग्णांना अपघात विभागात हलवले.

कोल्हापूरचा थोरला दवाखाना अशी सीपीआरची ओळख आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरत आहे. नेहमी वर्दळ असलेल्या या रुग्णालयातील एका महत्त्वाच्या विभागाला अशा पद्धतीने आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सिपीआरला भेट देत माहिती घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button