कोरोनासोबत जगण्याची सवय करा; मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचं थैमान सुरु असतानाच काही ठिकाणांवर कोरोनाचा असणारा प्रभाव आणि या परिस्थितीतही तेथे उचलली जाणारी महत्त्वाची अशी प्रतिबंधात्मक पावलं ही अनेकांसाठी आदर्श प्रस्थापित करत आहेत. सध्या अशीच चर्चा सुरु आहे ती म्हणजे दिल्लीतील परिस्थितीची. या मुद्द्यावर खुद्द दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच महत्त्वाची माहिती दिली.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना केजरीवाल यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि या परिस्थितीचा सामाना करणारा आपला देश या विषयांवर त्यांची मतं मांडली. कोरोना व्हायरसवर ल़ॉकडाऊन हा काही उपाय नाही. पण, या मार्गाने कोरोनाला आळा घालण्यास मदत होऊ शकते, असं ते म्हणाले. शिवाय केंद्र सरकार आणि पंतप्रधानांकडून वेळीच घोण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयाचंही त्यांनी समर्थन केलं. मुळात कोरोना विषाणूवर अद्यापही कोणत्याही प्रकारची प्रभावी लस सापडलेली नाही. या परिस्थिती विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडला गेला. पण, त्यामुळे काही या विषाणूचा खात्मा होणार नाही. असं असलं तरीही वाढत्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यास नक्कीच मदत होईल, असं ते म्हणाले.




