breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोनामुळे ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह बंद राहणार!

नवी दिल्ली | देशातील अनेक भागामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यातच मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीत देखील कोरोना बाधित काही रुग्ण आढळून आले आहेत.

अशा वेळी हा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी दिल्लीतील सिनेमागृह ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) याबाबतची घोषणा केली. मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ‘राजधानी दिल्लीतील सर्व सिनेमा हॉल ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. तसंच ज्या शाळा आणि कॉलेजमध्ये बोर्डाच्या परीक्षा नाहीत त्या शाळा-कॉलेज या महिन्याच्या शेवटपर्यंत बंद राहतील.’

आतापर्यंत दिल्लीत कोरोना व्हायरसचे सहा रुग्ण सापडले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी दिल्लीत एक ६९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यासह, दिल्लीमध्ये या विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या सहावर पोहोचली आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालयात महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. या महिलेचा मुलगा नुकताच जपान, जिनिव्हा आणि इटलीला जाऊन आला आहे. ही महिला पश्चिम दिल्लीतील जनकपुरी येथील आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button