Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-194.png)
कोरोना विषाणू आता भारतातही सर्वत्र पसरत चालला आहे . देशभरात आतापर्यंत एकूण ८२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र उपचारांनंतर 11 जण बरेही झाले आहेत. तर, दोनजण कोरोनाचे बळी ठरले आहेत… केंद्र सरकारनं याबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत देणार असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
करोनाचा उद्रेक पाहता देश, तसेच जगभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. अमेरिकेने तर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. तसेच राज्यातही शाळा, कॉलेज,मॉल 31 मार्चपर्यंत बंद राहणार असल्यांच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे.