breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोनानंतर चीनमध्ये प्लेगचं संकट…

कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एका आजाराचे संकट बळावलं आहे. ब्यूबोनिक प्लेगची दोन रुग्ण आढळल्यामुळे चीनमध्ये खळबळ उडाली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोरोनाच्या संकटावर काही प्रमाणात मात केल्यानंतर आता चीनमध्ये आणखी एक संकट आलं आहे. उत्तर चीनमधील बयन्नुर शहरातील ब्यूबोनिक प्लेगचा फैलाव झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगोलियाच्या स्वायत्त क्षेत्रातील बयन्नूर शहरातील ब्युबोनिक प्लेगचे दोन प्रकरणे समोर आली आहेत. संपूर्ण शहरात प्लेगच्या बचावासाठी तीन स्तरीय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चीन सरकारचे वृत्तपत्रानुसार हा अलर्ट २०२० वर्षाअखेरपर्यंत असू शकतो. प्लेगची बाधा झालेल्या व्यक्तींना वेगळे ठेवण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. ब्यूबोनिक प्लेग विषाणू संसर्गाचे मुख्य कारण असून यामुळे प्राण गमावण्याची शक्यता असते. मात्र, यावर मात करण्यासाठी अॅण्टीबायोटीक उपलब्ध आहे.

प्लेगची बाधा कशी झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तीन स्तरीय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आता प्लेग पसरवणाऱ्या प्राण्यांचे मांस खाण्यास बंदी आणली जाऊ शकते. प्लेगची लक्षणे आढळल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे. जगभरात ब्यूबोनिक प्लेगचे रुग्ण आढळत असतात. मादागास्करमध्ये २०१७ मध्ये ब्यूबोनिक प्लेगचे ३०० हून अधिक रुग्ण आढळले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button