breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश! 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा
पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 1 वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. या जवानाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आणि सुरक्षा दलाला जदुरा परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली होती. यावेळी एका ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसल्यानं सुरक्षा दलानं परिसराला घेराव घालून सरेंडर करण्याचं आवाहन केलेलं मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केलेला होता.