breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कलिंगा स्टेडियममध्ये कोरोना वॉरियर्सच्या गाैरवासाठी 500+ खेळाडूंचा पुढाकार

लंडन| ब्रिटनच्या सरकारने १ जूनपासून घरच्या स्पर्धा आयोजनास परवानगी दिली आहे. मात्र, चाहत्यांच्या येण्यावर बंदी कायम राहील. मार्चच्या मध्यापासून खेळ पूर्णपणे बंद आहे. घोडेस्वारी आणि स्नूकरचे सामने सोमवारपासून सुरू होतील. इंग्लिश प्रीमियर लीगला १७ जूनपासून सुरुवात हाेईल.

न्यूयॉर्क| यूएस ओपनला २४ ऑगस्टपासून सुरुवात हाेईल. सहभागी खेळाडूंना चार्टर विमानाने बोलावण्याची तयारी करत आहे. प्रवासापूर्वी खेळाडूंना कोविडची चाचणी करणे आवश्यक राहील.

इंग्लंड | देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याविरोधात लढणाऱ्या लोकांच्या सम्मानासाठी खेळाडू पुढे आले. भुवनेश्वरच्या कलिंग हॉकी स्टेडियममध्ये कोरोना वाॅरियर्सच्या सन्मानार्थ क्रीडा विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले. यात खेळाडू व कलाकार सहभागी झाले होते. दुसरीकडे डुप्लेसिसने ३५००० लहान मुलांना अन्नाची पाकिटे वाटली. ताे जनजागृतीसाठी परिसरात जात आहे.

कोलंबो| श्रीलंकेचे १३ खेळाडू सोमवारपासून सराव सुरू करतील. १२ दिवसांचे शिबिर कोलंबो क्रिकेट क्लबमध्ये होईल. एका गटात चार खेळाडू असतील. सहभागी खेळाडू सरावानंतर हॉटेल किंवा सराव परिसरातून बाहेर जाऊ शकणार नाहीत. मार्चपासून देशात क्रिकेट बंद आहे. जुलैमध्ये टीम भारताला दौऱ्यासाठी बोलवू इच्छिते. 

भुवनेश्वर| हाॅकी स्टेडियममध्ये खेळाडू व कलाकारांसह ५०० पेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. यात हॉकी संघाचा माजी कर्णधार दिलीप तिर्की, धावपटू दुती चंदसह अनेक खेळाडू उपस्थित होते. विविध विभागांत काम करत असलेले खेळाडू ेखील स्वयंसेवक म्हणून मदतीसाठी धावले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button