औरंगाबादमध्ये मॉर्निंग वॉकसाठी विनामास्क नागरिकांची गर्दी; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली समज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/morning-walk.png)
मॉर्निंग वॉकसाठी औरंगाबादच्या गोगाबाबा टेकडीवर हजारो नागरिकांची गर्दी उसळली आहे. यावेळी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी विनामास्क वॉक करणाऱ्यांना मास्कचा वापर करण्याची समज दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून ट्रेकिंग आणि मॉर्निंग वॉक करणाऱ्यांमध्ये मास्क लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली. मास्क न वापरताच अनेकजण मॉर्निंग वॉक करत होते. त्यामुळे सुनील चव्हाण यांनी मास्क वापरण्यासाठी जागृती करत सूचक उपक्रम राबवला.
औरंगाबाद जिल्ह्यात काल 313 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 537 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 362 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजार 911 झाली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 684 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 690 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.