breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला; 7 जण ठार, तर अनेकजण जखमी

नवी दिल्ली: ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहरात 6 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार, या दहशतवादी हल्ल्यात हल्लेखोरांसह 7 जणांचा मृत्यू झालेला आहे. व्हिएन्ना पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात बरेच लोक जखमी झालेले आहेत. व्हिएन्ना पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये असे सांगण्यात आलेले की, सोमवारी रात्री आठ वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शहरातील 6 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबारच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत एका अधिकाऱ्यासह अनेक लोक जखमी झालेले आहेत.

याव्यतिरिक्त, पोलिस अधिकाऱ्यांनी संशयित हल्लेखोरला गोळ्या घालून ठार केलेलं आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये व्हिएन्ना पोलिसांनी लोकांना या हल्ल्याबाबत सावधगिरी बाळगण्यास सांगितलेले आहे. लोकांना खबरदारी घेण्याचा सल्ला देण्याबरोबरच पोलिसांनी अफवांपासून दूर राहण्यासदेखील सांगितलेले आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे की, “कृपया कोणत्याही अफवा, आरोप, अनुमान किंवा बळी पडलेल्यांची पुष्टी न झालेल्यांची संख्या पाहू नका. यामुळे कोणत्याही प्रकारे मदत होणार नाही! घरात रहा! आश्रय घ्या, सार्वजनिक ठिकाणांपासून दूर रहा.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button