‘एम-पेसा’ या पेमेंट बँक कायमची बंद…खातेधारकांनी त्वरित आपले पैसे काढून घ्यावे…😟
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-99.png)
वोडाफोनच्या ‘एम-पेसा’ या पेमेंट बँकेने भारतातून गाशा गुंडाळला आहे. त्यामुळे ‘एम-पेसा’च्या खातेधारकांना ठराविक अवधीपर्यंत आपल्या खात्यातील रक्कम काढून घ्यावी लागणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने एम-‘पेसा’चा परवानाच रद्द केला आहे. वोडाफोनच्या ‘एम-पेसा’ या पेमेंट बँकेचं कामकाज आता बंद करण्यात आलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Vodafone-mpesa-image-1024x512.jpg)
‘एम-पेसा’च्या खातेधारकांना ठराविक कालावधीत आपल्या खात्यातील रक्कम काढून घ्यावी लागणार आहे. सातत्याने होणाऱ्या नुकसानामुळे ‘वोडाफोन’ने आरबीआयकडे लिक्विडेशनसाठी अर्ज केला होता.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/1462344428-9265.jpg)
बँकिंग सेवा घराघरात पोहचवण्याच्या उद्देशाने ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने 2015 मध्ये पेमेंट बँक सुरु केली होती. देशातील 41 कंपन्यांनी ‘आरबीआय’कडे अर्ज केले होते. त्यापैकी 11 कंपन्यांना परवाना जारी करण्यात आला होता.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/rbi-reuters.png)
वोडाफोनने स्वेच्छेनेच ‘एम-पेसा’ लिक्विडेट म्हणजेच बंद करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने वोडाफोन ‘एम-पेसा’चं प्राधिकारण प्रमाणपत्र (सीओए – Certificate of Authorization) रद्द केलं आहे. त्यामुळे ‘एम-पेसा’ प्रीपेडशी निगडीत व्यवहार करु शकणार नाही. थोडक्यात पेमेंट बँकेच्या कामकाजाला खीळ बसली आहे.