breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एन्काऊंटरमध्ये मारला गेला कुख्यात गुंड विकास दुबे

कानपूर | कुख्यात गँगस्टर विकास दुबे पोलीसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. यूपी एटीएस त्याला कानपूरला घेऊन येत होती. तेव्हा गाडी पलटली. या घटनेशी संबंधीत सूत्रांनी सांगितले की, गाडी उलटल्यानंत पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न विकास दुबे करत होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला त्यानंतर दोघांमध्ये चकमक झाली. बिकरू गावांत दोन जुलै रोजी रात्री आठ पोलिसांना ठार करून विकास दुबे फरार होता. मध्यप्रदेश पोलिसांनी या कुख्यात गुंडाला उज्जैनच्या महाकाल मंदिरातून गुरूवारी अटक केले. यूपी एटीएस विकासला घेऊन गुरूवारी रात्री कानपूरसाठी रवाना झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जैनहून कानपूरला येणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यातील विकास दुबे याला घेऊन जाणारी गाडी कानपूरजवळ पलटली. या अपघातानंतर विकास दुबे याने पोलिस कर्मचाऱ्यांच्या हातातील पिस्तुल घेऊन पळाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळी पोलीस आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. त्यानंतर पोलीसांच्या गोळीबारात तो जखमी झाला. जखमी अवस्थेतत त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्याने प्राण सोडले. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने एन्काउंटरमध्ये विकास दुबे ठार झाल्याचे वृत्त दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button