Breaking-newsताज्या घडामोडी
उत्तर प्रदेश: कालव्यात कोसळला व-हाडाचा ट्रक; १४ ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/etah-.jpg)
एटा- साखरपुड्याचे वर्हाड घेऊन जाणारा ट्रक उत्तर प्रदेशातील एटा येथे कालव्यात कोसळून झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात 28 जण जखमी झाले आहेत. ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
जखमींना जलेसर सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमींना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
साखरपुड्यावरून परतत होते वर्हाड…
जखमींना जलेसर सीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच गंभीर जखमींना आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
साखरपुड्यावरून परतत होते वर्हाड…
– मिळालेली माहिती अशी की, वर्हाड आग्रा येथून साखरपुडा पार पाडून ट्रकने परतत होते. एटामधील जलेसर येथे ट्रक थेट कालव्यात कोसळला.
– या भीषण अपघातात ट्रकमधील 14 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत.
– ट्रक चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
पोलिसांविरोधात घोषणाबाजी….
– घटनास्थळी जिल्हाधिकारी अमित किशोर आणि एसएसपी सत्यार्थ अनिरुद्ध पोलिस फोर्ससह पोहोचले.
– दुर्घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.
– पोलिस उशीरा पोहोचल्याने संतप्त जमावाने त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. रस्ता रोको आंदोलन केले.