Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
इराणमध्ये अडकलेल्या 58 भारतीयांची सुटका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/9-4.jpg)
नवी दिल्ली, 10 मार्च : इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणण्यात आलं आहे. एअरफोर्सच्या विमानानं हे भारतीय देशात आलेत. या भारतीयांना आणण्यासाठी सी-17 ग्लोबमास्टर (C-17 Globemaster) विमान पाठवण्यात आलं होतं.
इराणमधील कोरोनाव्हायरसच्या प्रकोपामुळे काही भारतीय तिथं अडकले. या भारतीयांना आणण्यासाठी सोमवारी एअरफोर्सचं सी-17 ग्लोबमास्टर विमान पाठवण्यात आलं. इराणमधील भारतीयांच्या पहिल्या बॅचला घेऊन हे विमान भारतात आलं आहे. यामध्ये 58 भारतीय भाविकांचा समावेश आहे. गाझियाबादमधील हिंडन एअरफोर्स स्टेशनवर हे विमान उतरलं. यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इराणमधील भारतीय दूतावासाचे आभार मानले.