इंधनाची दरवाढ सुरुच, 16 दिवसात पेट्रोल प्रतिलिटर नऊ रुपयांनी महागले
![Petrol diesel prices rises to its peak since 25 Months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/petrol-price-hike-1.jpg)
नवी दिल्ली : इंधनाच्या किमतीत सलग सोळाव्या दिवशी दरवाढ सुरुच आहे. पेट्रोल प्रतिलिटर 33 पैसे तर डिझेल 58 पैशांनी महाग झालेले आहे. 16 व्या दिवशी किमती मध्ये मोठी वाढ झालेली आहे. गेल्या पंधरवड्यात पेट्रोल प्रतिलिटर तब्बल 9.21 रुपयांनी महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी झाले असले तरी 7 जूनपासून सुरु झालेली इंधन दरवाढ थांबायचं नाव घेत नाहीये.
गेल्या दोन आठवड्यांपासून सलग इंधन दरवाढ सुरुच राहिल्याने सर्वसामान्य वाहनचालक पुरते त्रासून गेले आहेत. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 33 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा भाव 79 रुपये 56 पैशांवर पोहोचला आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 58 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचे दर प्रतिलिटर 78 रुपये 85 पैसे झाले आहेत.
16 दिवसात इंधन किती महाग?
पेट्रोल प्रतिलिटर 9.21 रुपयांनी महागले
डिझेल प्रतिलिटर 8.57 रुपयांनी महागले