breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
इंडिका, इंडिगोचे उत्पादन टाटा मोटर्सकडून बंद
नवी दिल्ली: ‘इंडिका’ आणि ‘इंडिगो’ या गाड्यांचं उत्पादन टाटा मोटर्सनं बंद केलं आहे. बाजारातील प्रचंड स्पर्धा आणि कमी झालेली विक्री या कारणांमुळे ‘टाटा’नं हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे उत्पादन बंद झाले असले तरी सध्या बाजारात असलेल्या गाड्यांना सेवा पुरवण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
‘एसआयएएम’च्या आकडेवारीनुसार, मार्च २०१८पर्यंत ‘इंडिका’चे २,५८३ तर ‘इंडिगो’चे १,७५६ युनिट्स विकले गेले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत हा खप अत्यंत कमी आहे. त्यामुळंच एप्रिलपासून या गाड्यांचं उत्पादन थांबवण्यात आलं आहे.