breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

आता इम्तियाज जलील यांचा मशिदीकडे मोर्चा… आज मशिद उघडून नमाज करणार !

औरंगाबाद | MIM चे खासदार एम्तियाज जलील हे राज्यातील मंदिरे आणि मशिद उघडण्याच्या मागणीसाठी चांगलेचं आक्रमक झाले आहेत.आज (2 सप्टेंबर) ला औरंगाबादमधील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. जलील यांच्या या घोषणेमुळे आज पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये तणावपूर्ण स्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जलील आज दुपारी शहागंज येथील मशिद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.

दरम्यान, मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर आपण मंदिरे उघडणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती. औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिर उघडणार असल्याचं त्यांनी सांगितल होतं मात्र त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मोठं वाकयुद्ध झाल्याचं काल पाहायला मिळालं. बराच काळ औरंगाबादमधील वातावरण देखील तणावपूर्ण झालं. त्यामुळे आजही शहरात कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button