breaking-newsताज्या घडामोडी

आज दुपारी (ता. 20) 2 पासून ते गुरुवारी (ता. 23) रात्री 12 पर्यंत सोलापूरात संपूर्ण संचारबंदी

सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठेत आठ दिवसांपूर्वी कोरोनाबाधितचा पहिला रुग्ण आढळला आणि कोरोनाने जिल्ह्यातील पहिला बळी घेतला. आठ दिवसांनी कोरोनाने दुसरा बळीही घेतला. तेलंगी पाच्छा पेठ, रविवार पेठ आणि भारतरत्न इंदिरानगर या तीन भागांत 15 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 13 जणांवर उपचार सुरू आहेत. सोलापुरात फैलावत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी सोमवारी म्हणजे आज दुपारी दोनपासून ते गुरुवारी (ता. 23) रात्री 12 पर्यंत सोलापूर शहरात संपूर्ण संचारबंदी व शहराच्या हद्दी बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 15 रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण सोलापूर शहरातील आहेत. ग्रामीण भागातील व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज रात्री उशिरा आदेश पारित केला आहे. 10 पानांच्या या आदेशात ग्रामीण भागातील व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी अटी देण्यात आल्या आहेत. 

सोलापूर शहरातील बॅंका संपूर्ण संचारबंदी आदेशातील कालावधीत सोलापूर शहरातील संपूर्ण बॅंका बंद असणार आहेत. बॅंक व बॅंक कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी केले आहे. 

तसेचं लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्व आस्थापन आणि शहराच्या सर्व हद्दी बंद करण्यात येणार आहे…तसेच वैद्यकिय विभाग, पाणीपुरवठा, पोलिस यंत्रणा,विद्यूत पुरवठा, अग्निशमन सेवा, यांना संचारबंधीतून पुर्णपणे वगळण्यात आलं आहे,…तसेच रुग्णालय, खाजगी दवाखाने,रुग्णवाहिका, मेडिकल अशा सर्व सेवा सुरु राहणार आहेत…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button