‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून ‘बच्चू कडूंची’ ‘मोदींवर’ सडकून टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/bachhu-kadu-bjp.jpg)
मुंबई | महाईन्यूज
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर राजकीय मंडळी देखील पंतप्रधान मोदी आणि पुस्तक लिहिणाऱ्यांवर देखील टीका करत आहेत. प्रहार संघटनेचे नेते आणि मंत्री बच्चू कडू यांनी देखील या प्रकरणावरून मोदींवर कठोर शब्दांत टीका केलेली आहे.
अमरावती मध्ये बोलताना बच्चू कडू म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले तरी ते शिवाजी महाराजांच्या एका दिवसाचीच काय एका क्षणाचीही बरोबरी करू शकणार नाहीत. पुस्तकात दिल्याप्रमाणे कोणीही कोणाला अशी उपमा देऊ नये. मोदी स्वत:ला शिवाजी महाराजांचे भक्त किंवा सैनिक म्हणू शकतात. मात्र महाराजांशी तुलना हा शिवरायांचा अपमान आहे. त्यामुळे याचा निषेध करत कडू यांनी पुस्तकावर बंदी आणण्याची तीव्र मागणी केलेली आहे.