breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आकाशातून पडली २.७५ किलो वजनाची अज्ञात वस्तू

जालौर | राजस्थानमधील जालौर जिल्ह्यातल्या सांचौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आकाशातून एक पावणेतीन किलो वजनाची अज्ञात वस्तू पडली. धातूसदृश असलेली ही वस्तू जमिनीवर पडताच दूर पर्यंत मोठा आवाज आल्याचे अनेकांना सांगितले. गायत्री कॉलेज जवळ मोकळ्या जागेवर अज्ञात वस्तू पडली. अज्ञात वस्तू आपटल्यामुळे जमिनीवर १० इंचाचा खोल खड्डा झाला आणि वस्तू त्या खड्ड्यात पडली.

या प्रकरणी सकाळी सहाच्या सुमारास पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वस्तू काय आहे ते तपासण्याचा प्रयत्न केला. अज्ञात वस्तूमधून वाफ येत होती आणि त्या वस्तूचे तापमान खूप जास्त होते. अखेर काही तास थांबून तापमान कमी झाल्यावर ती अज्ञात वस्तू काळजीपूर्वक उचलून पोलीस ठाण्यात नेण्यात आली. या प्रकरणी वरिष्ठांना माहिती देण्यात आली असून तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button