breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत लाेकांना मास्क नकोत, 18 राज्ये ‘रेड झाेन’

अमेरिकेत काेराेनावरील नियंत्रण कठीण हाेत चालले आहे. येथे गेल्या एका महिन्यात दरराेज आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा विक्रम माेडीत निघाला आहे. येथे २४ तासांत ७५ हजार ६०० रुग्ण आढळून आले. सर्वाधिक कोरोनापीडित ब्राझील व भारतातील एकूण रुग्णसंख्येहून हे प्रमाण जास्त आहे. ब्राझीलमध्ये चोवीस तासांत ३३ हजार ३५९ व भारतात ३४ हजार ८२० रुग्ण आढळले. परिस्थिती बिघडल्यामुळे आरोग्य विभागाने कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, टेक्साससह १८ राज्यांत रेड झोन घोषित केला.

एक लाख लोकसंख्येमागे १०० नवे रुग्ण अशा सरासरीनुसार अमेरिकेत रेड झोन मानला जातो. सूत्रांच्या मते व्हाइट हाऊसने गेल्या आठवड्यात एक अहवाल तयार केला होता. हा अहवाल मात्र जाहीर झाला नव्हता. त्यात प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत.

त्यानुसार अनेक राज्यांत लॉकडाऊनचे नीटपणे पालन झाले नाही. लोक घरात राहणे पसंत करत नाहीत. ते मास्कदेखील लावत नाहीत. त्यामुळे कोरोना वेगाने फैलावत आहे. या राज्यांतील लोकांनी कोरोनाला रोखण्यासाठी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे, असे अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३७ लाख ७१ हजार १०१ रुग्ण आढळून आले आहेत, तर १ लाख ४२ हजार ८० जणांचा मृत्यू झाला. कोरोनापासून संरक्षणासाठी लोकांना मास्क लावण्याचे आदेश दिले जाणार नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. देशातील आघाडीचे संसर्ग रोगतज्ञ डॉ. अँथनी फॉसी यांनी स्थानिक नेत्यांना लोकांना मास्क लावण्यासाठी प्रेरित करावे, असे फॉसी यांनी आवाहन केले. त्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे वक्तव्य जारी झाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button