अमेरिकेत दर ४० सेकंदाला एकाचा कोरोनाने मृत्यू
![News that raises There is no evidence of death due to emergency practiceconcerns among Indians; Daily patient growth reaches new heights](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/CORONA-DEATH-EDITED.png)
वॉशिंग्टन – जगातील कोरोना परिस्थिती दिवसागणिक बिकट होत आहे. अमेरिकेत कोरोनाचे संकट प्रचंड गडद होताना दिसतेय. तब्बल सहा महिन्यानंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून प्रत्येक ४० सेंकदाला एका रुग्णाला जीव गमावावा लागल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
मागील २४ तासांत अमेरिकेत २ हजार १५७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. मे महिन्यानंतर हा कोरोनाबळींचा सर्वाधिक आकडा आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासांत ४० सेंकदात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.
दरम्यान, कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्याने अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेड शिल्लक राहिलेले नाहीत. मंगळवारी अमेरिकेत १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला असून १२.६ मिलियन नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत.