अमेरिकेच्या कंपन्यांवर चीनकडून बंदी
बीजिंग – तैवानला शस्त्रास्त्रविक्री करणाऱया अमेरिकेच्या 3 कंपन्यांवर चीनने बंदी घातली आहे. अमेरिकेची बोईंग डिफेन्स, लॉकहीड मार्टिन आणि रेथियॉन या कंपन्यांना चीनमध्ये आता कुठलाच व्यवहार करता येणार नसल्याची घोषणा चिनी विदेश मंत्रालयाने केली आहे.
21 ऑक्टोबर रोजी तैवानला 1.8 अब्ज डॉलर्सच्या शस्त्रास्त्र विक्रीनंतर ही बंदी घालण्यात आली आहे. या शस्त्रास्त्रांमध्ये सेंसर, क्षेपणास्त्रs आणि तोफा यांचा समावेश आहे. शस्त्रास्त्रविक्री करणाऱया कंपन्यांना शिक्षा करण्याचा चीनला पूर्ण अधिकार असल्याचा दावा विदेश मंत्रालयाने केला आहे.
तैवानला संरक्षण क्षमता बळकट करण्यासाठी 135 टारगेटेड ग्राउंड अटॅक क्षेपणास्त्रs, सैन्य उपकरणे आणि प्रशिक्षणसंबंधी सामग्रीच्या विक्रीला मंजुरी दिल्याचे अमेरिकेच्या विदेश विभागाने बुधवारी जाहीर केले होते. हा व्यवहार 1 अब्ज डॉलर्सहून अधिक रकमेचा आहे. या क्षेपणास्त्रांची निर्मिती बोइंगने केली आहे. या व्यवहारात तैवानला एफ-16 लढाऊ विमानासाठी ऍडव्हान्स सेंसर, समुद्रात शत्रूच्या युद्धनौका नष्ट करण्यासाठी सुपरसोनिक लो अल्टिटय़ूड क्षेपणास्त्रs आणि हॅमर्स रॉकेट दिले जाणार आहेत. मागील वर्षीच अमेरिकेने तैवानला 66 एफ-16 लढाऊ विमाने पुरविण्याचा करार केला होता.