अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Amit-Shah.jpg)
नवी दिल्ली | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचं वृत्त भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी दिली आहे. ट्विटरवरुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. अमित शहा यांची २ ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना तात्काळ गुरुग्रामधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
अमित शहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली होती., ‘कोरोनाची सुरुवातीची लक्षणे आढळून आल्यानंतर मी कोरोना टेस्ट करुन घेतली आणि कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझी तब्येत ठीक आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी कृपया आपली टेस्ट करुन घ्यावी.’दरम्यान, काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला होता. शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा ट्वीट करुन आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती.