breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अडीच महिन्यात भारताने चीनला दोनवेळा गुडघ्यावर आणलं, जिनपिंग चिनी सैन्यातल्या कमांडर्सवर नाराज

नवी दिल्ली | प्रत्येक मोहिमेवर चीनची पिछेहाट होते आहे. त्यामुळे शांघायपासून बिजिंगपर्यंत जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षात सन्नाटा पसरला आहे. जिनपिंग यांच्या चेहऱ्यावरचे भाव तसे चटकन लक्षात येत नाही. मात्र, लडाखमध्ये दोन वेळा चिनी सैन्यांना मागे हटावं लागलं आणि तिकडे जिनपिंग यांच्या तळपायातली आग मस्तकापर्यंत गेली.

लडाखमध्ये मार खाल्ल्यामुळे रागानं लालबुंद झालेले जिनपिंग चिनी सैन्यातल्या कमांडर्सवर नाराज आहेत. जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्ष सुद्धा चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांवर प्रश्न उभे करु लागला आहे.

फक्त अडीच महिन्यातच भारतीय सैन्यानं चीनला दोनवेळा गुडघ्यावर आणलं. 15 जूनला जिनपिंग यांचा वाढदिवस होता. नेमक्या त्याचदिवशी अनेक चिनी जवानांना जीव गमवावे लागले. भारतीय जवानांनी प्राणाची बाजी लावून असंख्य चिनी सैनिकांना मारलं. चीनचं सरकार त्या धक्क्यातून सावरतच होतं. तेवढ्यात पँगाँगच्या ब्लॅक टॉपवरुन चिनी सैनिकांना पळ काढावा लागला. हे दोन्ही धक्के जिनपिंग यांच्या जिव्हारी लागले. म्हणूनच या महिन्याच्या सुरुवातीलाच चीननं अरुणाचल आणि कैलास मानसरोवरात दुप्पटीनं सैन्य वाढवलं.

जिनपिंग यांच्या नाराजीनंतर चिनी कमांडर्सनी एलएसीजवळ मिलिट्री डील सुरु केल्या. दिवस-रात्र युद्धाचा सराव सुरु झाला. भारतानं केलेल्या दोन वारांमुळे चीन किती चवळताळून उठला. वेगवेगळ्या भागातून चिनी सैनिकांना अरुणाचल, सिक्कीमच्या बॉर्डरवर आणलं गेलं. 100 हून जास्त गाड्यांमध्ये चिनी सैन्य तातडीनं सीमेवर पाठवलं गेलं. मिलिट्री ड्रिलमध्ये चीनच्या 1 हजारांहून जास्त सैन्याचा समावेश होता. लाईव्ह फायर ड्रिलमध्ये असंख्य रणगाडे, मिसाईल्सचा वापर केला गेला

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button