breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शिवछत्रपतींचा आवमान करणारे प्रफुल्ल पटेलांचे डोके ठिकाणावर आणावे लागेल’; राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते

शिवछत्रपतींची आणी महाराष्ट्राची अस्मिता दुखावली

पिंपरी | रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप हा त्यांची विशेष ओळख आहे. शौर्य आणि पराक्रमाचे धाडस, निष्ठा, शिवसाम्राज्याचे प्रतीक म्हणून हा टोप ओळखला जाते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांनी मोदी यांची मर्जी मिळवून त्यांना खुश करण्यासाठी मोदी यांच्या डोक्यात जिरेटोप घातल्याने शिवछत्रपतीचा, शिवभक्तांचा अवमान झाला आणि महाराष्ट्राची अस्मितेचा, शौर्याचा अवमान पटेल यांनी केला आहे. आता त्यांचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिरेटोपाला एक विशेष महत्त्व आहे. शिवछत्रपती यांनी केलेला पराक्रम, युद्धसाहस व सैन्यातील मावळ्यांचे प्रेरणास्थान हा जिरेटोप आहे तामाम शिवप्रेमी आणि माहाराष्ट्र राज्याच्या गौरवाचे ते प्रतीक आहे आणि महाराष्ट्राने सांस्कृतिक वारसाचा एक महत्त्वाचा घटक आणि अस्मिता म्हणून त्यास जपले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती हा जिरे टोप घालून सबंध महाराष्ट्रातील जनतेचा आणि महाराष्ट्र राज्यातील अस्मितेचा अवमान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी केला आहे त्यांचा आम्ही तीव्र शब्दांमध्ये निषेध करीत आहोत. पंतप्रधानाकडून काहीतरी मिळवायचे म्हणून स्वागत कशा पद्धतीने करावे हा त्यांचा प्रश्न आहे, मात्र लाचारी करुन निष्ठेचे प्रतीक असलेला जिरेटोप हा आमच्या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. याचा आवमान आम्ही सहन करनार नाही,देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्याशी गद्दारी करनारे अनिष्ठावान प्रफुल्ल पटेल यांना निष्ठा काय समजणार पटेल यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अस्मितेशी खेळू नये.

हेही वाचा     –   लहान मुलांना कुलर समोर झोपवताय? ते हे वाचाच

त्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा त्यांना वेगळा टोप आम्ही घालू. पृथ्वीतलावर पात्रता असणारे केवळ एक आणि एकच रयतेचे राजे शिवछत्रपती आहेत त्यांचा जिरे टोप घालून अवमान करणे हा महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. म्हणून राष्ट्रवादीचे पटेल यांचे डोके ठिकाणावर आणण्याची गरज आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि यादरम्यान त्यांनी मोदी यांच्या डोक्यावर स्वहस्ते शिवछत्रपतींचा जिरे टोप चढवला वास्तविक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे शिवछत्रपतीची उंची गाठणे व जिरे टोप घालणे हे त्यांच्याशिवाय पृथ्वीतलावर शक्यच होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपले सर्वांचे, रयतेचे दैवत आहेत मात्र त्यांचा अवमान करण्याचे काम भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रभात लोढा, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. याचे उत्तर आता महाराष्ट्रातील जनता मत रूपाने त्यांना नक्कीच दाखवून देतील असेही प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button