breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय फुटबॉलचा कोहिनूर सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा!

Sunil Chhetri Retirement | भारतीय फुटबॉलपटू आणि भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सुनील छेत्रीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. सुनील छेत्री ६ जून रोजी कुवेतविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.

सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉलचा चेहरा आहे. त्याने देशासाठी १५० सामन्यात ९४ गोल केले आहेत. तो सध्या आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. निवृत्तीची घोषणा करताना छेत्रीने भारतासाठी फुटबॉल खेळण्याच्या प्रवासाच्या आठवणी सांगितल्या आणि सांगितले की मी माझा पहिला सामना खेळलो ते मला अजूनही आठवते. माझा पहिला सामना, माझा पहिला गोल, हा माझ्या प्रवासातील सर्वात संस्मरणीय क्षण होता. देशासाठी इतके सामने खेळू शकेन, असे मला कधीच वाटले नव्हते. निवृत्तीबद्दल सांगताना म्हणाला, जेव्हा त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला तेव्हा त्याने सर्वप्रथम आई-वडील आणि पत्नीला याबद्दल सांगितले.

हेही वाचा     –      पिंपरी-चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट, पवना धरणात पाणीसाठा किती? 

तो पुढे म्हणाला की, मी प्रथम माझ्या आई-वडिलांना आणि पत्नीला या निर्णयाबद्दल सांगितले. माझे वडील खुश झाले पण आई आणि बायको रडायला लागल्या. मी आईला म्हणालो की, तू मला नेहमी म्हणत होता की मला खेळताना पाहून तुला खूप दडपण येतं पण आता तसं होणार नाही. मी भारतासाठी पुन्हा खेळणार नाही मग तू का रडत आहेस.

सुनील छेत्रीने १२ जून २००५ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यातच त्याने पहिला आंतरराष्ट्रीय गोलही केला. छेत्रीने त्याच्या शानदार कारकिर्दीत सहा वेळा एआयएफएफ प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. याशिवाय त्यांना २०११ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१९ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button