breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंना संधी

Team India : विश्वचषकात भारतीय संघाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्कारावा लागला. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. २३ नोव्हेंबरपासून पाच टी-२० सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय टी-२० संघाची घोषणा केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदाजी जबाबदारी सोपवली आहे. तर ऋतुराज गायकवाड याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. २३ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबर दरम्यान ही मालिका खेळवली जाणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी विशाखापट्टनम येथे पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला अजून एक आवाहन; म्हणाले.. 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० मालिका वेळापत्रक :

  1. २३ नोव्हेंबर, गुरुवार, राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम
  2. २६ नोव्हेंबर, रविवार, ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
  3. २८ नोव्हेंबर, मंगळवार, बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी
  4. ०१ डिसेंबर, विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
  5. ०३ डिसेंबर, राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), ईशान किशन, यशस्वी जयस्वाल, टिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button