breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागपुरात हिट अँड रन, ९ जणांना कारने चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

नागपुर | नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी नागपुरात रामझुलावर झालेल्या अपघातात मद्यधुंद कारचालक रितिका मालू हिने दोन युवकांचा बळी घेतला होता तर आता एका भरधाव कारने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघाताचा थरार रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिघोरी टोल नाक्याजवळ झाला.

याप्रकरणी कारच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. कांतीबाई गजुड बागडिया (४२, करवली, बुंदी- राजस्थान) आणि सीताराम बाबुलाल बागडिया (३०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर कविता बागडिया, सुमन बागडिया, सीना बागडिया, सकीना बागडिया, संमद खजूर बागडिया, बुरा हनुमान बागडिया, पानबाई मानसिंग बागडीया अशी जखमींची नावे आहेत.

हेही वाचा    –      ‘पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ मूळ जागीच होणार’; केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या कारचालक भूषण लांजेवार याला अटक केली आहे. वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी तो त्याच्या मित्रासोबत गेला होता. तो उमरेड मार्गाकडे जात असतांना लांजेवारचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. या कारखाली तीन महिला, चार मुले व एका पुरुष आला. यात एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका लहान मुलीचा देखील मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा आक्रोश पाहायला मिळाला. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वाठोडा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने सर्व जखमींना उपचारासाठी दवाखान्यात भरती केले, उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोधमोहीम राबविली व कारचालक भूषण लांजेवार याला अटक केली. या अपघातात आणखी पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button