breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

आरतीच्या वेळी टाळ्या वाजवण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे?

Ganesh Utsav 2023 : आरती, भजन, किर्तन सुरू असेल तेव्हा लोक टाळ्या वाजवतात. टाळ्या फक्त ताल धरण्यासाठी म्हणून वाजवल्या जात नाहीत. यामागे काही धार्मिक, वैज्ञानिक कारणं, फायदे आहेत का? विषयी सविस्तर जाणून घेऊया.

टाळी वाजवण्याचं धार्मिक महत्व : 

धार्मिक दृष्टीने विचार केला तर आपल्या समाजात असं मानलं जातं की टाळी वाजवून तुम्ही देवाला तुमची गाऱ्हाणी ऐकायला बोलावतात. असं केल्याने देवाचं लक्ष वेधलं जातं असं लोक मानतात. याशिवाय आरती, भजन, किर्तन करतेवेळी टाळी वाजवल्याने पापांचा समूळ नाश होतो अशी आख्यायिका आहे. तसेच टाळी वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते.

हेही वाचा – ‘अजित पवारांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार’; रोहित पवार यांचं विधान चर्चेत

टाळी वाजवण्याचं वैज्ञानिक महत्व :

आरतीच्या वेळेस टाळी वाजवण्याचा आपण वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास अ‍ॅक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब पडतो, तसेच याव्यतिरिक्त हृदय आणि फुफ्फुसासंदर्भातील आजारांना दूर ठेवण्यास देखील मदत होते. यामुळे ब्लड प्रेशर देखील नियंत्रणात राहतं. टाळी वाजवण्याला एक योग्य समजलं गेलं असल्याने या पद्धतीने अनेक रोगांपासून दूर राहण्यास देखील मदत होते.

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. आम्ही अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button