‘कोविशिल्ड’चा पुरवठा नाही, रविवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार
![Only a second dose of the vaccine will be available in Mumbai tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/corona-vaccine.jpg)
पिंपरी चिंचवड | ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या (रविवारी) फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिक आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना 6 केंद्रांवर उद्या ‘कोव्हॅक्सिन’ची लस देण्यात येणार आहे.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी आणि जुने जिजामाता रुग्णालय येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा डोस मिळणार आहे.
कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या 90 आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 10 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन अॅपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.
तर, 45 वर्षांपुढील नागरिकांना कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल आणि अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी येथे पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅपद्वारे 90 आणि किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेल्या 10 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. ‘कोविशिल्ड’ लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने उद्या ‘कोविशिल्ड’ची लस मिळणार नाही.